- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादी माहिती मिळत नसल्याने माहीत अधिकार कायदा अंमलात आणला गेला.काही ठिकाणी माहिती दिली जाते,तर काही ठिकाणी माहिती अधिकार कायद्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत.पण,एका प्रकरणात केवळ मिळालेल्या माहितीच्या आधारे तीन अपत्ये असणाऱ्याच्या मुलाला अनुकंपा नोकरी मिळाल्याने तसेच उच्च न्यायालयाने याबाबत महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,सांगली येथील संजय खांडेकर यांचे वडील एका खाजगी अनुदानित शाळेत शिपाई म्हणून काम करत होते.त्यांना तीन मुले आहेत. वडिलांच्या निधनानंतर सुरुवातीला संजय यांना शाळेने अनुकंपा तत्त्वावर नोकरी दिली.त्यानंतर,मात्र तीन मुले असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा नोकरीचा लाभ देता येत नाही; तसा नियम राज्य शासनाने तयार केला आहे.त्यामुळे संजय यांच्या प्रस्तावाला शिक्षण अधिकाऱ्याने मान्यता देण्यास नकार दिला.प्रकरणी संजय खांडेकर यांनी ॲड.संजय माने यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.त्यानुसार,न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती अजित काडेठाणकर यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.तीन मुले असलेल्या कर्मचाऱ्याच्या मुलाला अनुकंपा नोकरीचा लाभ देता येत नाही,असा नियम असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला.मात्र,सदरचा नियम हा खासगी शाळेतील शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू होत नाही,अशी कबुली माहिती अधिकारात स्वतः प्रशासनाने दिल्याचे ॲड.माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. प्रकरणी याची नोंद घेत न्यायालयाने संजय खांडेकर यांची मागणी मान्य करून प्रस्तावाला मंजुरी द्या तसेच त्यांना अनुकंपा नोकरीत सामावून घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने शिक्षण विभागाला दिला आहे.
- Advertisement -

