Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरआजपासून दोन दिवसीय 'जय भीम' साहित्य संमेलन..

आजपासून दोन दिवसीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-शहराच्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात आज,शनिवार २० डिसेंबर व उद्या,रविवार २१ डिसेंबर रोजी दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. आज दुपारी ४ वाजता ग्रंथदीडी,५.३० वाजता उद्घाटन सोहळा,सायंकाळी ७ वाजता कविता संमेलन,रात्री ८ वाजता मी रमाई बोलते एकपात्री प्रयोग, ८.३० वाजता परिसंवाद, ९.३० वाजता जयभीम जलसा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा विभाग,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,मुंबई आणि लोकजागृती नाट्य कला,क्रीडा,सांस्कृतिक,शैक्षणिक व सामाजिक संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय तिसरे राष्ट्रीय ‘जय भीम’ साहित्य संमेलन पार पाडले जाणार आहे. मागील वर्षात ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२४ रोजी दुसरे राष्ट्रीय जयभीम साहित्य संमेलन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी नाट्य सभागृहात पार पडले होते.
आज २० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चंद्रपूर बसस्थानकापासून नाट्य सभागृहापर्यंत आयोजित केलेल्या ग्रंथदींडीतून या महोत्सवाची सुरुवात होणार आहेत.संध्याकाळी ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन गृहविभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव श्याम तागडे यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण गायकवाड,जिल्हाधिकारी विनय गौडा,प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे,पत्रकार देवेंद्र गावंडे, प्रा.डॉ.इसादास भडके उपस्थित राहणार आहेत.सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविण्याचे आवाहन मुख्य संयोजक डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!