Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीउद्याला गडचिरोली नगरपरिषदेतील तीन तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी मतदान..

उद्याला गडचिरोली नगरपरिषदेतील तीन तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी मतदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या,शनिवार २० डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्यातील एकूण चार प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.यामध्ये गडचिरोली नगरपरिषदेतील तीन तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागाचा समावेश असून या निवडणुकीसाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे.या निवडणुकीत एकूण १२ हजार ५९२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रभाग १(अ)मध्ये ३ हजर १३९,प्रभाग ४(ब) मध्ये ३ हजार ५७२ तसेच प्रभाग ११(ब) मध्ये ४ हजार १९४ असे एकूण १० हजार ९०५ मतदार असून,आरमोरी नगरपरिषदेच्या प्रभाग १०(अ) मध्ये १ हजार ६८७ मतदारांचा समावेश आहे.
गडचिरोली नगरपरिषदेतील तीन प्रभागांसाठी ११ मतदान केंद्रे तर आरमोरी नगरपरिषदेतील एका प्रभागासाठी ३ मतदान केंद्रे अशी एकूण १४ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी गडचिरोली येथे दोन आणि आरमोरी येथे एक असे एकूण तीन क्षेत्रीय अधिकारी (झोनल अधिकारी)नियुक्त करण्यात आले आहेत.
निवडणुकीसाठी मतदान पथके सज्ज असून त्यांचे अंतिम प्रशिक्षण आज,शुक्रवार १९ डिसेंबर रोजी पूर्ण करण्यात आले आहे.मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहणार आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मतदारांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!