Thursday, October 15, 2026
Homeचंद्रपूरदोन पोलिसांना आर्थिक देवाण- घेवाण करणे पडले महागात- दोन्ही कर्मचाऱ्यांना केले निलंबित;...

दोन पोलिसांना आर्थिक देवाण- घेवाण करणे पडले महागात- दोन्ही कर्मचाऱ्यांना केले निलंबित; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 चंद्रपूर (तळोधी बा.) :-तळोधी बा.पोलिस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आर्थिक देवाण घेवाणी वरून चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार सुरेश पानसे व पोलिस शिपाई मनीष गेडाम यांना निलंबित केले आहे. 

नवानगर वॉर्डातील मायाबाई बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरी गेल्याची तक्रार देण्यात आली.संशयित म्हणून त्याच वॉर्डात राहणार अश्विन मेश्राम या युवकाचे नाव समोर आले.चौकशी करिता मेश्राम यांना पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आले व त्यांना मारहाण करून त्यांच्या कडून १५००० रुपये पानसे व गेडाम या कर्मचाऱ्यांनी घेतले.व त्यापैकी पाच हजार रुपये मायाबाईला दिले.मायाबाईने ते पैसे दुसऱ्या दिवशी परत केले.एकंदरीत हे सर्व प्रकरण पैसे घेऊन दडपण्याचा प्रयत्न दोन्ही कर्मचारी करीत होते. या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजीत सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक नागपूर,पोलिस अधीक्षक चंद्रपूर, विभागीय पोलीस अधिकारी ब्रह्मपुरी यांना या प्रकरणाबाबत पत्रव्यवहार केला.तसेच विनाकारण मारहाण करून व जबरदस्तीने पैसे घेऊन मानसिक त्रास दिल्याबद्दल अश्विन मेश्राम यांनीसुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दोन कर्मचाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली.तसेच मायाबाई बोरकर यांनीसुद्धा मला न्याय मिळावा; यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.या तक्रारीच्या आधारे दोनही कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली तसेच सर्वांचे बयान घेण्यात आले व सरतेशेवटी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिस अधीक्षक चंद्रपूर यांनी तात्काळ दोनही कर्मचाऱ्यांना निलंबित केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!