Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरअस्वल गावात येतांना दिसली अन् आरडाओरड करता थेट घरातच शिरली; सकाळच्या घटनेने...

अस्वल गावात येतांना दिसली अन् आरडाओरड करता थेट घरातच शिरली; सकाळच्या घटनेने गावकरी भेदरले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गावालगत असलेल्या जंगल परिसरातील
हिंस्त्र प्राणी थेट गावात येऊन घरात प्रवेश करू लागल्याने संपूर्ण गावकरी भेदरून गेल्याची घटना आज,मंगळवार १८ नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे सकाळी पाचच्या सुमारास घडली.जंगल परिसरातून ठुमकत-ठुमकत निघालेल्या एका अस्वलाने गावात एंट्री केली. गावात एंट्री करताच काही नागरिकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात करताच घाबरलेल्या अस्वलाने थेट घरात प्रवेश करून तिथेच बस्तान मांडल्याने गावात एकच खळबळ माजली.प्रकरणी वन विभागाचे पथक आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून अस्वलीला पिंजऱ्यात पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते.
माहितीनुसार,आज सकाळच्या सुमारास डोंगरगाव येथील काही नागरिक घराशेजारी शेकोटी शेकत असतांना त्यांना गावात अस्वल आल्याचे दिसले. त्यामुळे घाबरलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली.ओरड सुरू असतांनाच अस्वलीने थेट ६० वर्षीय शेतकरी सुंदर जुमनाके यांच्या घरात प्रवेश करून तिथेच बस्तान मांडला.घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली आणि सदरची माहिती वन विभागासह पोलीस प्रशासनास दिली.वन विभागाची चमू व पोलिसांनी घटनास्थळ गाठत नागरिकांना सतर्क केल्याने मोठी जीवितहानी टळली. डोंगरगाव हा घनदाट जंगल परिसराला लागून असल्याने गावकऱ्यांना नेहमीच हिंस्त्र प्राण्यांचे दर्शन तर होतेच,मात्र आता वन्यप्राणी चक्क गावात येऊ लागल्याने गावकरी धास्तावले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!