Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकाही ठिकाणी सुरू झाली; तर काही ठिकाणी अजूनही प्रतिक्षाच..! - धान खरेदी...

काही ठिकाणी सुरू झाली; तर काही ठिकाणी अजूनही प्रतिक्षाच..! – धान खरेदी केंद्राअभावी व्यापारी वर्गाला धानविक्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-आधीच नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.अवकाळी पावसात धानाच्या कडपा भिजल्याने धानाची गुणवत्ता घसरली.धान कापणी, बांधणी व मळणीच्या कामाची मजुरांची मजुरी देणे असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मजुर वर्ग जास्त दिवस थांबत नसल्याने शेतकऱ्यांना नाइलाजास्तव  व्यापारी वर्गाला धान विकावे लागत आहे.अश्यातच धान खबरा आहे,पाखर आहे व इतर कारणे पुढे करून व्यापारी वर्ग धानाचे दर मोठ्या प्रमाणात पाडत आहेत.परिणामी,शेतकऱ्यांना अव्वाच्या-सव्वा दरात धानाची विक्री करावी लागत आहे. व्यापाऱ्यांकडून धानाला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्या हातात रोख पैसा राहत नाही आणि जैसे थे अवस्था होत असते.विशेष म्हणजे,ऑक्टोंबर-नोव्हेंबर हा धान कापणीचा मुख्य हंगाम असतांना,याच काळात अधिकृत धान खरेदी केंद्रे कां सुरू होत नाही? असा सवाल शेतकरी वर्गातून सातत्याने उपस्थित केला जातो आहे.त्यातच,राज्याच्या विविध जिल्ह्यात काही ठिकाणची धान खरेदी केंद्रे सुरू झाली असून बऱ्याच ठिकाणची धान खरेदी केंद्रे अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याने शासनाचे शेतकऱ्यांप्रती असलेले
उदासीन धोरण स्पष्ट होत असून याविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.बऱ्याच ठिकाणची अधिकृत धान खरेदी केंद्राची नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसल्याने आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू होणार तरी कधी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष घालून धान खरेदी केंद्राची नोंदणी प्रक्रिया लवकरात-लवकर सुरू करावी,अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!