गोंदिया :-गोरेगाव वनपरिक्षेत्रात येणाऱ्या घुब्बेटोला जंगल शिवारात जीवंत गावठी बॉम्ब ठिकठिकाणी आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.गोरेगाव वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या मोहाडी वनक्षेत्रातील घुब्बेटोला जंगलात शिकारींनी टाकलेल्या जीवंत गावठी बॉम्बची एक म्हैस बळी पडली आहे. मोहाडी वनक्षेत्रातील हिराटोला/घुब्बेटोला ही गावे जंगलांना लागून आहेत.शेतकऱ्यांची शेती या जंगलांनी वेढलेली आहे.शेतकरी अनेकदा जंगलात त्यांचे पशुधन चारण्यासाठी घेऊन जातात.अश्याच प्रकारे जंगल परिसरात गुरे चराई करीत असतांनाच एका म्हशीने जीवंत गावठी बॉम्ब चघळला.यात म्हशीचा जबडा पूर्णतः फुटल्याने शेतकरी इंकराम रहांगडाले यांचे मोठे नुकसान झाले आहे.घटनेमुळे घुब्बेटोला आणि हिराटोला परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरपाईसह सखोल चौकशी करण्याची मागणी माजी पंचायत समिती सभापती मनोज बोपचे यांनी गोरेगाव वन विभागाकडे केली आहे.
- मनोज गाढवे,वनपरिक्षेत्र अधिकारी गोरेगाव👇

