Sunday, July 12, 2026
Homeनागपूरएक चूक अन् नगर सेवक पदाचा अर्ज बाद..!

एक चूक अन् नगर सेवक पदाचा अर्ज बाद..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-जिल्ह्याच्या नरखेड शहरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे,अर्ज भरला नगर सेवक पदासाठी,पण अर्जातील माहिती टाईप करतांना ‘सदस्य’ ऐवजी ‘नगराध्यक्ष’ असा उल्लेख करण्यात आल्याने छाननी अंती नगर सेवक पदाचा अर्ज बाद ठरविण्यात आल्याने नगरविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निर्णयाचा तीव्र विरोध केला असून या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहेत.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून प्रभाग क्रमांक-२ (ब)साठी अफशिन शोएब शेख यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.याच पदाकरिता त्यांनी अनामत रक्कमदेखील जमा केले.अर्जामधील संपूर्ण तपशील हा प्रभाग-२(ब)चा असून सदस्य म्हणूनच भरलेला आहे.मात्र,अर्जाच्या पहिल्या ओळीत ‘नगराध्यक्ष’ असा उल्लेख आहे.ही टायपिंगमधील चूक म्हणून नोंदली गेली आहे. छाननीदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी उमेश खोडके यांनी या तांत्रिक चुकांच्या आधारे त्यांचा उमेदवारी अर्ज ‘अध्यक्ष’ पदाचा म्हणून ग्राह्य धरत अवैध ठरविला.अफशिन शेख यांनी ही त्रुटी केवळ टाइपिंगमधील असून,अर्जाचा आशय,वर्ग,अनामत रक्कम आणि प्रभाग सर्व सदस्य पदानुसार असल्याचे सांगून अर्ज वैध ठरविण्याची विनंती केली होती.मात्र, त्यांची विनंतीवजा मागणी फेटाळण्यात आली.त्यामुळे प्रभाग-२ (ब)मधील राजकारणात अचानक खळबळ उडाली असून,निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या आदेशाविरुद्ध त्या कायदेशीर लढा देणार आहेत.महत्वाचे म्हणजे,अफशिन शोएब शेख या नरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुशीर शेख यांच्या भावाच्या पत्नी होत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्रशासकांच्या आर्थिक अधिकारांवर मर्यादा; ग्रामीण अर्थचक्र मंदावले.. – ग्रामपंचायत निवडणुका पुढल्याच वर्षी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालवा,यासाठी सरकारने माजी सरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय समिती म्हणून नेमणूक केली आहे.त्यानुसार,माजी सरपंच...

३० वर्षीय तरुणाच्या कमरेत आढळली पिस्तूल; तर पॅन्टच्या खिशात आढळल्या पाच गोळ्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एका ३० वर्षीय तरुणास अवैध शत्र बाळगल्या प्रकरणी अटक करून त्याच्याकडील पिस्तूल व पाच...

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!