Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे.. -प्रभाग क्रमांक दोन मधून...

देसाईगंज नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे.. -प्रभाग क्रमांक दोन मधून कुलदीप आमले नावास पसंती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंजता(गडचिरोली):-देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रातील निवडणुकीचे वारे सध्या जोर धरत असून नगरपरिषद अध्यक्षपद तसेच प्रभागनिहाय नगरसेवकपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता केवळ निवडणुकीच्या तारखेची औपचारिक घोषणा बाकी आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.अश्यातच शहराच्या प्रभाग क्रमांक-२ मधून कुलदीप आमले या तरुण,ऊर्जावान आणि समाजाभिमुख कार्यकर्त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु असून जनतेकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे सरसावलेले उच्चशिक्षित आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणींमध्ये नेहमी पुढाकार घेणारे आमले हे नाव देसाईगंजकरांसाठी नवे नाही.लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांदरम्यान जनतेत रात्रंदिवस फिरून कार्यकर्त्यांबरोबर काम करणारे,लोकसंपर्काचे जाळे मजबूत ठेवणारे आणि समाजातील सर्व घटकांमध्ये आपुलकीने वावरणारे व्यक्तिमत्व म्हणून आमले ओळखले जातात.त्यांचे नम्र स्वभाव, कार्यतत्परता आणि जनतेशी जुळलेली नाळ यामुळे प्रभाग क्रमांक-२ मधील नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारीस पाठिंबा जाहीर केला आहे.स्थानिक नागरिकांबरोबरच विविध समाजघटक,तरुण मंडळी तसेच प्रतिष्ठित नेतेमंडळींनीही कुलदीप आमले यांच्या पाठीशी उभे राहत त्यांना समर्थन दिले आहे.या उत्स्फूर्त पाठिंब्यामुळे आमले यांनी नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक-२ मधून लढण्याचा निर्णय दृढ केला आहे.
कुलदीप आमले यांनी सांगितले की,जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद मिळाला असून देसाईगंज शहराच्या प्रभाग क्रमांक-२ मधील विविध विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि तरुणांसाठी रोजगार निर्मिती या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार असून माझा हेतू राजकारण करणे नसून जनसेवा करणे आहे.
विशेष म्हणजे,दरवर्षी स्थानिक निवडणुकीच्या रिंगणात तेच-तेच चेहरे म्हणजे “तोच बोवा येतो अन् तोच बोवा जातो” असे करण्यापेक्षा एकदा तरी नव्या चेहऱ्यांना संधी देणे गरजेचे झाले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!