- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-एका ४० वर्षीय शिक्षकाने घरी कुणीही नसतांना पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल शहरात उघडकीस आली आहे.विवेक विनोद हरमवार वय ४० वर्षे रा.वॉर्ड क्रमांक-१४ मूल शहर असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते मूल तालुक्यातील चांदली बुज गावचे मूळ रहिवासी होते.दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर काल शुक्रवार शाळेचा पहिला दिवस होता. शाळेच्या पहिल्याच दिवशी ते गैरहजर असल्याने शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांना फोन केला.वारंवार फोन करूनही कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याने मुख्याध्यापकांनी हरमवार यांच्या पत्नीला फोन केला. पत्नीला फोनवरून विचारणा केली असता त्यांनी माहेरी असल्याचे सांगितले.त्यानंतर पत्नी व नातेवाईकांनी विवेक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही.संपर्क होत नसल्याने पत्नी व नातेवाइकांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यामुळे पत्नी व नातेवाइक मूल येथील घरी परतले असता विवेक हरमवार हे घरातील पंख्याला लटकून असल्याचे दिसून आले.लागलीच कुटुंबीयांनी मूल पोलिसांना घटनेची माहिती दिली.मूल पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.घटनेने हरमवार कुटूंबीय शोकसागरात बुडाला आहे.मृतक शिक्षक विवेक हरमवार हे मूल शहराच्या बाल विकास प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक पदावर बऱ्याच कालावधीपासून कार्यरत होते.त्यांनी आत्महत्येसारख्या अचानक घेतलेल्या निर्णयाने शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे.प्रकरणाचा पुढील तपास मूल पोलीस प्रशासन करीत आहे.
- Advertisement -

