- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-अवैध रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांना मिळताच त्यांनी एका अवैध रेतीने भरलेल्या टिप्परचा पाठलाग करतांना तिसऱ्याच व्यक्तीने बोलेरो वाहन मधोमध आणून कारवाईत अडथळा आणल्याने वळण मार्गावरील शेतात उपविभागीय अधिकाऱ्यांचे वाहन उलटून अपघात घडल्याची घटना आज,गुरुवार ९ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दवडीपार ते पचखेडी स्मशानभूमी रस्त्यावर घडली.यात उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे आणि त्यांचे पती किरकोळ जखमी झाल्याने त्यांचेवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकरणी एमएच ३६ एएल २८५३ क्रमांकाच्या बोलेरो वाहन व एमएच ३६ एए ४१०६ क्रमांकाच्या टिप्पर वाहन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०९,१३२, ३(५),३०३(२),जमीन महसूल कायद्याच्या उपकलम ४८ आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या उपकलम ७ आणि ९ अंतर्गत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास एपिआय प्रशांत साखरे करीत आहेत.
- Advertisement -

