Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाचिखलीच्या आंचिव हायस्कूल येथील सावित्रीच्या लेकिंना सायकलींचे वितरण..

चिखलीच्या आंचिव हायस्कूल येथील सावित्रीच्या लेकिंना सायकलींचे वितरण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या चिखली येथील आंचिव हायस्कूलच्या तब्बल २९ सावित्रीच्या लेकिंना शाळेचे मुख्याध्यापक डहाडे,शाळेचे शिक्षकवृंद कर्मचारी पालक महेश बनोठे,प्रल्हाद सहारे गुलाब टेंभुर्णे,मनेश मडावी,गोपाल लाडे,जानबा भोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजयादशमीच्या(दसरा)दिवशी सायकली प्रदान करण्यात आल्या.
चिखली येथील आंचिव शाळेत आजूबाजूच्या गाव परिसरातील मुली शिक्षण घेत असून दररोज कितीतरी किलोमिटर अंतर पायदळी तुडवून शाळेत येत असतात. सदरची बाब शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकवृंदांच्या निदर्शनास आली.त्यानुसार शाळेच्या वतीने शिक्षणासाठी पायदळ येणाऱ्या मुलींचा शोध घेण्यात आला असता यात शाळेतील तब्बल २९ विद्यार्थिनी आढळून आल्या. शाळेच्या वतीने क्षणाचाही विलंब न लावता मानव विकास मिशन योजनेअंतर्गत प्रस्ताव तयार करण्यात आले.त्यानंतर जिल्हा प्रशासनास प्रस्ताव पाठवून विद्यार्थिनींची निकड लक्षात घेता सायकलींचे वाटप करण्यात आले.मानव विकास मिशनच्या माध्यमातून विद्यार्थिनींना शालेय शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि शालेय उपस्थितीत वाढ करणे आहे.सायकलींचे वाटप करतेवेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!