Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजशिवराजपूर ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम..

शिवराजपूर ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने स्वच्छता मोहीम..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या
शिवराजपूर येथील ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने आज,रविवार २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.विशेष म्हणजे, शिवरजपुरसह ऊसेगाव,फरी व इतर गावातील ग्रामस्थांना तसेच वाहनधारकांना वळण मार्गावरील कचरा व झाडांमुळे समोरील व्यक्ती दिसत नसल्याने एखादेवेळी अपघात होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने वळण मार्ग तसेच परिसरातील साफसफाई करण्यात आली.
शिवराजपूरच्या वळण मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा व झाडे असल्यामुळे मार्गावरून आवागमन करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कचऱ्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला होता.या गंभीर समस्येवर उपाय म्हणून शिवराजपूर येथील ज्ञानज्योती युवा मंडळातील सर्व तरुणांनी एकत्र येऊन कचरा साफसफाई मोहिम राबवली.मोहिमेत कचरा व झाडे तोडून मार्ग स्वच्छ करण्यात आला.यामुळे आता वाहनधारकांसह नागरिकांना आवागमन करण्यास सुलभता निर्माण झाली असून अपघाताचा धोका टळला आहे.ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने परिसरात राबविलेल्या स्वच्छता मोहीम उपक्रमाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!