Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसावधान..! सोशल मीडियाचा वापर जरा जपून.. - आक्षेपार्ह व्हिडीओसह फोटो एडिट करण्याचा...

सावधान..! सोशल मीडियाचा वापर जरा जपून.. – आक्षेपार्ह व्हिडीओसह फोटो एडिट करण्याचा धोका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसून येतो.त्यातच आता  एआयची क्रेझ वाढलेली दिसून येते.एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलीजेन्स ज्याला मराठीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ म्हणतात.हे एक नव्या युगाचे तंत्रज्ञान असून जी मशिनला मानवासारखी विचार,निर्णय,समस्या तसेच शिकण्याची क्षमता देत असते.आजच्या घडीला एआय आणि खास फोटो एडिट ॲप्सद्वारे आपले थ्रीडी, कार्टूनाइज्ड,विंटेज फोटो व ॲनिमेशन तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याचा कल वाढलेला आहे.यात गोपनीयता व डेटा सुरक्षेची चिंता तर आहेच, तसेच या एडिटेड फोटोला ‘डीपफेक’ करून आक्षेपार्ह व्हिडीओ बनविला जाऊ शकतो.त्याचबरोबर दोन व्यक्तींना एकत्र दाखविणारा व खराखुरा वाटणारा फोटोही तयार केला जाऊ शकतो.यातून नाहक बदनामी होऊन मनःस्तापाला सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे असे ॲप्स वापरतांना खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
एआय तंत्रज्ञानाचा वापर करून दोन वेगळ्या व्यक्तींचे चेहरे जोडून खोटे फोटो तयार केले जातात,जे खरे वाटतात.अशा खोट्या फोटोंमुळे समाजात गैरसमज निर्माण होतात.अशा घटनांचा काही तरुणी तसेच महिलांना देखील फटका बसला आहे.अश्याच प्रकारची घटना चालू वर्षातील जुलै महिन्यात गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आली होती.तिरोडा तालुक्याच्या लाखेगाव येथीय ३२ वर्षीय विवाहित महिला इन्स्टाग्राम वापरत होत्या.२४ मे २०२५ रोजी सकाळच्या सुमारास त्या मोबाइलवर इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असतांना एका अकाऊंटवर त्यांचा चेहरा असलेला आणि दुसऱ्या महिलेचे अर्धवट उघडे शरीर असलेला अश्लील फोटो आढळला होता.त्यानुसार गावातीलच २५ वर्षीय तरुणावर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत व बदनामीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
एआय आधारित साधने आणि मोफत उपलब्ध ॲप्स एका क्लिकमध्ये चेहरा बदलून किंवा फोटो मॉर्फ करून चुका संदर्भातील प्रतिमा तयार करू शकतात.या प्रतिमांचा वापर करून प्रत्यक्ष व्यक्तींचे फोटो डार्क वेबवर विकले जातात आणि त्यावरून ब्लॅकमेलिंगही केले जाते. काही वेळा पीडितांना त्याची माहितीदेखील नसते. याशिवाय सायबर फसवणुकीचे गुन्हेदेखील यातून होतांना दिसून येतात.तुम्ही जेव्हा फोटो एडिट करण्यासाठी ॲपला तुमच्या गॅलरीची किंवा कॅमेऱ्याची परवानगी देता,तेव्हा तुमचा डेटा त्यांच्या सर्व्हरवर अपलोड होतो.हा डेटा नंतर चुकीच्या कामांसाठी वापरला जाऊ शकतो किंवा विकला जाऊ शकतो.अनावश्यक परवानग्या देऊन स्वतःचा डेटा धोक्यात घालू नका.जर फसवणूक झालीच,तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा.तुमचा डिजिटल डेटा सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे,याची जाण नागरिकांना असली पाहिजे, असे सायबर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!