Wednesday, September 2, 2026
Homeचंद्रपूरप्रेमविवाहाचा शेवट.. गर्भवती महिलेने विष प्राशन करून केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात..!

प्रेमविवाहाचा शेवट.. गर्भवती महिलेने विष प्राशन करून केली आत्महत्या; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-प्रेमविवाहास कुटुंबीयांचा विरोध असतांना दोघांनी प्रेमविवाह केला.विवाहानंतर दोघेही गावातच कुटुंबापासून वेगळे राहू लागले आणि २३ वर्षीय पत्नी सात महिन्याची गभवती राहिली.अश्यातच दोन दिवसांपूर्वी म्हणजेच मंगळवारी सकाळच्या सुमारास तिने अचानकपणे विष प्राशन करून जीवनाचा आणि प्रेमविवाहाचा शेवट केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील कवडशी देश गावात घडली असून काल बुधवारी २४ सप्टेंबरला सर्वत्र उघडकीस आली.प्रणाली राकेश गरमडे वय २३ वर्षे,रा.कवडशी देश,ता.चिमूर,जि.चंद्रपूर असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.सात महिन्याच्या गर्भवती महिलेने अचानकपणे एवढे टोकाचे पाऊल कां उचलले? हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.
घटनेच्या दिवशी पती राकेश गरमडे घरीच होता.सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्रणालीने  कीटकनाशक फवारणीचे औषध प्राशन केले.औषध प्राशन केल्याने तिला कसेतरी वाटू लागले.त्यामुळे तिने सकाळी झोपेत असलेल्या पतीला उठवून कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे सांगितले.लागलीच पती राकेशने घराशेजारील नागरिकांच्या मदतीने पत्नीला तात्काळ नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिथे उपचार सुरू असतांनाच  गर्भवतीने प्राण सोडला.डॉक्टरांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना देत मृतदेहाचे शवविच्छेदन केले.त्यानंतर मृतदेह स्वाधीन करण्यात आला.घटनेचा पुढील तपास शंकरपूर पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!