- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत कार्यरत कनिष्ठ लिपिक महादेव गणपत झाडे यांच्या नागरिकांसोबतच्या गैरवर्तनाविरुद्ध आज,मंगळवार २३ सप्टेंबर रोजी आम आदमी पार्टीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष राजू मडावी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुरखेडा तहसीलदार राहुल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात रेशन कार्ड प्रक्रियेत नागरिकांना होणारा त्रास आणि अपमानास्पद वागणुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार,महादेव झाडे हे रेशन कार्ड अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्रास देत आहेत.अर्जात त्रुटी असल्यास अर्जदारांवर अर्ज भिरकावण्याचे आणि उद्धटपणे वागण्याचे प्रकार घडलेले असून यामुळे महाराष्ट्र शासकीय कर्मचारी(वर्तणूक) नियम,१९७९ महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा,२०१५ आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा,२०१३ यांचे उल्लंघन होत आहे.त्यामुळे गैरवर्तनाची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी,येत्या आठ दिवसांत कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले जाईल.या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला तहसील प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल,असेही नमूद करण्यात आले आहे.
निवेदन सादर करतेवेळी आम आदमी पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष इरफान पठाण,सचिव अमृत मेहेर,जिल्हा कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार,संघटक ताहिर शेख,सहसंघटक चेतन गहाणे,सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम,सदस्य अंकुश मडावी आदी उपस्थित होते.
- Advertisement -

