उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.यामध्ये मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी सर्वाधिक बाधित झाले होते.महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या पंचनाम्यानुसार,एकूण ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलले आहे.त्यानुसार राज्य सरकारने आज,मंगळवार २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी पीक नुकसानभरपाई जाहीर केली आहे.खरीप २०२५ मधील पिकांच्या नुकसानीसाठी २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.मदत आणि पुनर्वसन विभागाने याबाबतचा शासन निर्णय आजच जाहीर केला असून ही रक्कम आजपासूनच वितरीत केली जाणार आहे. मराठवाड्यासह राज्यातील ज्या-ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या सर्व भागांतील शेतकऱ्यांचा या मदतीमध्ये समावेश करण्यात आला आहे.जून २०२५ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले होते.त्याकरिता ही मदत असणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पीक नुकसानभरपाई जाहीर.. – आजपासूनच रक्कम होणार वितरीत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

