- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-शासनाच्या विविध कल्याणकारी योजना गरजु कुष्ठांतेयांना मिळावेत, यासाठी आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांना साकडे घालून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

बऱ्याच विक्रुतीग्रस्त कुष्ठांतेयांना कुष्ठरोगामुळे आलेल्या अपायामुळे काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत असतो. कुष्ठांतेयांना मिळणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व ईतर कल्याणकारी योजनासाठी अपंग प्रमाणपत्राची ४० टक्के अट घातली आहे.तसेच कुष्ठरोगामुळे आलेल्या विक्रुतीला १५ ते २० टक्के अपंग प्रमाणपत्र दिले जाते.त्यामुळे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेपासून अनेक कुष्ठांतेय बांधव वंचित आहेत. शासनाच्या योजनांपासून कुणीही वंचित राहू नये तसेच घालण्यात आलेली अट रद्द करावी, यासाठी देसाईगंज आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीच्या वतीने आमदार मसराम यांना निवेदन सादर करण्यात आले.प्रसंगी सदर प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करेन,असे आश्वासन उपस्थित कुष्ठांतेयाना दिले.निवेदन सादर करतेवेळी देसाईगंज आत्मनिर्भर कुष्ठांतेय समितीचे अध्यक्ष महेंद्र खरकाटे,कुष्ठांतेय अधिकार मचंचे लतीफ शेख,संघर्ष समितीचे अध्यक्ष भरत दयलानी,विद्या कांबळे व गरजु कुष्ठांतेय नागरिक उपस्थित होते.
- Advertisement -

