उद्रेक न्युज वृत्त :-नक्षली संघटनेला आज मोठा हादरा बसला आहे.कुख्यात महिला नक्षलवादी पोथुला पद्मावती उर्फ सुजाता वय ६२ वर्षे रा.पेंचकलपेठ, जि.जोगुलांबा गाडवाल,तेलंगणा हिने आज,शनिवार १३ सप्टेंबर रोजी तेलंगणा पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले असून शरीर थकल्याने तसेच वयोमर्यादा होऊन शेवटचे जीवन सुखमय जावेत यासाठी सुजाताने आत्मसमर्पणासारखा निर्णय घेतल्याचे लक्षात येते. सुजाताला आत्मसमर्पण योजनेंतर्गत २५ लाख रुपये शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत.तिच्यावर नक्षल्यांच्या केंद्रीय समिती सदस्य,दक्षिण विभागाचे सचिवपद व दंडकारण्य विभागाच्या जनताना सरकारचा प्रभार होता.ती तब्बल ४३ वर्षांपासून नक्षलसंघटनेत सक्रिय होती.वेगवेगळ्या राज्यात तिच्यावर कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.सुजाताचा पतीही कुख्यात नक्षलवादी होता.माल्लोजुला कोटेश्वर राव उर्फ किशनजी असे त्याचे नाव असून तो २०११ च्या पश्चिम बंगाल मधील चकमकीत ठार झाला होता.सुजाता व तिचा पती हे दोघेही १९८० च्या दशकात गडचिरोलीत सक्रिय होते.पुढे १९९७ ते ९९ दरम्यान तिला दक्षिण बस्तर विभागीय समिती सदस्य पदावर बढती देण्यात आली.त्यानंतर दंडकारण्य विभाग आणि दक्षिण बस्तरमध्ये तिला महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.सुजाताचा पती ठार होताच ती संघटनेत अधिकच आक्रमकपणे सक्रिय झाली. यामुळे तिला २०२२ साली केंद्रीय समितीवर घेण्यात आले.ती कोया भाषेतून निघणाऱ्या ‘पेथुरी’ मासिकाची संपादक देखील होती.६३ राजकीय नेते व सामान्य नागरिकांसह २०७ जवानांच्या खुनाचा सुजातावर आरोप आहे.ताडमेटला,गादीरास, झिरम घाटी,चिंतागुफा, कोरजगुडा,टेकुलगुडे येथे नक्षल्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यांत तिचा सक्रिय सहभाग होता.काही काळापासून ती आजारी होती. त्यामुळे नक्षली सुजाताने आत्मसमर्पणाचा निर्णय घेतला आहे.
नक्षलवाद्यांना मोठा हादरा; कोट्यवधी रुपयांचे बक्षीस असलेल्या सुजाताचे आत्मसमर्पण.. – शरीर थकल्याने घेतला निर्णय..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

