- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मानकापूर चौकाच्या स्टेडियम मार्गावर स्कुल व्हॅन व स्कुल बसमध्ये जोरदार धडक होऊन स्कूल व्हॅनमधील आठ विद्यार्थी जखमी झाले,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली.अपघातात भवन्स कोराडी विद्यालय व नारायणा विद्यालयाच्या स्कुल बसमध्ये जोरदार धडक बसली. मार्गाच्या एकाच लेनवर दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने सदरचा अपघात घडला.अपघात घडताच रस्त्यावरून जाणाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मुलांना अपघातग्रस्त व्हॅनमधून बाहेर काढले.जखमी मुलांना वाचवित असतांना दोन मुले शुद्धीवर होती,तर काही मुले गाडीत बेशुद्ध पडली होती. त्यातील एका मुलाला फक्त मोठा आवाज ऐकू आला आणि नंतर काय घडले ते कळलेच नाही.काही पालकही काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले.अपघातादरम्यान वाहनाचे स्टिअरिंग व्हीलवर आदळल्याने व्हॅन चालकाच्या डोक्याला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली.जखमींना उपचारासाठी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि जवळच्या रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.मात्र,घडलेल्या अपघातात जीवितहानी टळली.
- Advertisement -

