Friday, September 4, 2026
Homeचंद्रपूरऐन गणेश विसर्जनाच्या दिवशीच अंमली पदार्थांची तस्करी.. - दोन आरोपी अटकेत; ब्राऊनशुगरसह...

ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशीच अंमली पदार्थांची तस्करी.. – दोन आरोपी अटकेत; ब्राऊनशुगरसह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे. त्यातच तरुणाई नशेच्या आहारी जाऊ लागल्याची घटना उघडकीस आली आहे.पोलीस यंत्रणा गणेश विसर्जनात व्यस्त असतांनाच अंमली पदार्थांच्या तस्करीचा डाव स्थानिक गुन्हे शाखेने हाणून पाडला आहे.जिल्ह्यात ऐन गणेश विसर्जनाच्या दिवशी अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची गुपित माहिती मिळताच सापळा रचून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर व हेरॉईन जप्त करून मादक पदार्थाची तस्करी करण्याकरिता वापरलेले वाहन,रोख रक्कम व मोबाईल,असा एकूण ३० लाख १९ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे.नितीन उर्फ छोटू शंकर गोवर्धन वय ४० वर्षे, रा.महात्मा फुले वॉर्ड,बाबुपेठ चंद्रपूर व २३ वर्षीय साहिल सतीश लांबदूरवार वय २३ वर्षे रा.भिवापूर वॉर्ड,चंद्रपूर अशी अटकेतील आरोपींची नावे असून अंमली पदार्थ अधिनियमा अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार,काल शनिवारी अनंतचतुर्दशी दिनानिमित्त चंद्रपूर शहरात विविध मंडळांच्या वतीने गणेश विसर्जन सुरू होते.त्यामुळे शहरातील संपूर्ण पोलीस यंत्रणा व्यस्त होती.अश्यातच आरोपींनी याच संधीचा फायदा घेत मादक पदार्थ आणण्याचा बेत आखला.मात्र,सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांनी नागपूर-चंद्रपूर मार्गावरील पडोली चौकात सापळा रचला. मिळालेल्या माहितीच्या आधारे नेमके तेच वाहन काही वेळातच मार्गावर येताच एमएच ३४ बीआर ७७६५ क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली असता,वाहनात तब्बल २९८ ग्रॅम ब्राऊनशुगर व हेरॉईन आढळून आली. प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला.पुढील तपास पडोली पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!