- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील मरु नदीच्या पुलावरून वळण घेतांना अनियंत्रित झालेली टाटा हॉरियर कार थेट ४० फूट उंचीवरून नदीत कोसळल्याने कार चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज, रविवार २४ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. सागर वाघमारे वय ३५ वर्षे रा.उमरेड,जि.नागपूर असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव असून अवघ्या चार महिन्यांपूर्वीच त्याने नवी कोरी कार खरेदी केली होती.

सागर वाघमारे हा आज सकाळच्या सुमारास काळ्या रंगाची टाटा हॉरियर कार घेऊन एकटाच नीरजकडून उमरेडच्या दिशेने जात होता.सकाळी ८ वाजताच्या दरम्यान मरु नदीच्या पुलावरून वळण मार्ग ओलांडत असतांनाच सागरचे कारवरील नियंत्रण सुटले आणि तो कारसह थेट ४० फूट उंच पुलावरून नदीत कोसळला. नदीपात्रात पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली.यामुळे सागरला बाहेर निघता न आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कार नदीपात्रातून बाहेर काढून सागरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.सागर वाघमारे हा हॉटेल व्यवसायिक होता. वडिलांचे निधन झाल्याने दोघे भाऊ हॉटेल व्यवसाय सांभाळत होते.त्यातच सागर याने चार महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती.
- Advertisement -

