Wednesday, July 15, 2026
Homeकुरखेडाकुरखेडा तालुक्यात युरीया खताचा तुटवडा... - कृषी विभागाने बाजारात युरीया खताची उपलब्धता...

कुरखेडा तालुक्यात युरीया खताचा तुटवडा… – कृषी विभागाने बाजारात युरीया खताची उपलब्धता सुनिच्छीत करावी- माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-खरीप हंगामातील रोवणीची  कामे आटोपलेली आहेत.रोवणी नंतर धान पीकाच्या वाढीकरीता युरीया खताची गरज असते.मात्र,ऐन गरजेच्या वेळेस शहरातील दुकानातून यूरीया खत गायब झाल्याने युरीया खताकरीता शेतकऱ्यांची  भटकंती सुरू आहे.त्यामुळे कृषी विभागाने तातडीने नियोजन करीत बाजारात युरीया खताची उपलब्धता सुनिच्छीत करावी, अशी मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांनी केली आहे.
कुरखेडा तालुक्यातील कृषी केंन्द्रात सद्या कुणाकडेही युरीया खत उपलब्ध नाही.त्यामुळे शेतकरी हैराण झालेले आहेत.रोवणी नंतर धान पीकाला युरीया खत उपलब्ध न झाल्यास पीकाची वाढ खुंटते.उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता असते.त्यामुळे तातडीने तालुक्याकरीता युरीया खताचा पुरवठा सुनिच्छीत करण्यात यावा. अनेकदा ज्यावेळी ज्या खताची उपलब्धता कमी व मागणी अधिक असते.अश्यावेळी काही विक्रेते अधिक नफा कमावण्याच्या हव्यासापोटी काळाबाजार करीत शासनाच्या सुनिच्छीत करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारत शेतकऱ्यांची लूट करतात. मात्र,यावेळी अडलेला शेतकरी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नाही.त्यामुळे कृषी विभागाच्या भरारी पथकाने तक्रारीची वाट न बघता प्रमुख विक्रेत्यांवर नजर ठेवत दुकानाच्या दर्शनीय भागात स्टाॅक व दर फलक लावण्यात आलेला आहे की नाही,याची खबरदारी घ्यावी,दुकान व गोदामाची नियमित तपासणी करावी, तसेच आणीबाणीच्या प्रसंगी खाजगी विक्रेत्यांच्या तुलनेत सहकारी संस्था मार्फत उपलब्ध करून देण्यात येणारा रासायनिक खत शाशकीय दरात मिळण्याची अधिक शाश्वती राहत असल्याने अधिकाधिक खत हा सहकारी संस्था मार्फतच शेतकऱ्यांना उपलब्ध होईल, असे नियोजन करावे,अशीही मागणी भाजपा जिल्हामहामंत्री तथा कुरखेडाचे माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे यांनी केली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!