- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पावसाने हजेरी लावली आहे.काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस बरसू लागला आहे.अश्याच प्रकारे आज,शनिवार १६ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस बरसला.यामुळे शेतावर तसेच इतर कामांसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.त्यातच लाखांदूर तालुक्याच्या चप्राड(सोनी) पहाडीजवळील शेतशिवारात एका वृद्धाचा अंगावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली.मनोहर वाकडू कुंभले वय ६८ वर्षे, रा.चप्राड,ता.लाखांदूर असे मृत पावलेल्या वृद्धाचे नाव आहे.
मनोहर कुंभले हे आज नेहमी प्रमाणे शेळ्या चराईसाठी शेतशिवारात गेले होते.शेळ्या चराई करीत असतांनाच दुपारच्या सुमारास अचानकपणे मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला.पाऊस सुरू झाल्याने पावसापासून बचाव करण्यासाठी मनोहर कुंभले यांनी एका झाडाचा आसरा घेतला.झाडाचा आसरा घेताच ज्या ठिकाणी ते उभे होते,नेमकी त्याच ठिकाणी क्षणात वीज कळालली आणि थेट त्यांच्या अंगावर कोसळली.यात ते जागीच गतप्राण झाले.सदरची घटना शेतशिवारात असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ गावात जाऊन माहिती दिली. त्यानुसार लाखांदूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविला.
- Advertisement -

