Tuesday, September 8, 2026
Homeभंडारानजरे समोरच वीज कोसळल्याने डोळे मिटले; क्षणात डोळ्यासमोर अंधार दाटला अन् दृष्टीच...

नजरे समोरच वीज कोसळल्याने डोळे मिटले; क्षणात डोळ्यासमोर अंधार दाटला अन् दृष्टीच गमावली..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-विदर्भातील काही जिल्ह्यात शुक्रवार ८ ऑगस्ट आणि काल,शनिवार ९ ऑगस्ट रोजी विविध भागात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसला. पाऊस बरसला खरी,पण बऱ्याच ठिकाणी अचानकपणे विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतावर वा इतर ठिकाणी कामांसाठी गेलेल्या नागरिकांची काहीकाळ तारांबळ उडाली होती.अश्यातच भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात विजेमुळे एका महिलेस दृष्टी गमवावी लागल्याची घटना उघडकीस आली आहे.शेतात काम करत असतांनाच महिलेच्या समोरच वीज कोसळल्याने तिने डोळे मिटले.डोळे उघडुन बघताच तिच्या डोळ्यासमोर अंधार दाटला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले.सदरची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी गावच्या शेतशिवारात काल शनिवारी घडली.यात खैरलांजी येथील ४८ वर्षीय प्रमिला मुकेश पुसाम या महिलेने विजेच्या कडाक्याने दृष्टी गमवावी लागली आहे.प्रमिला पुसाम या घरी असलेल्या गुरांना चारा आणण्यासाठी शेतावर गेल्या होत्या.चारा कापत असतांनाच दुपारच्या सुमारास अचानकपणे पावसाने हजेरी लावली.पाऊस बरसत असतांनाच प्रमिला यांच्या नजरे समोरच धाडकन वीज कडाडली.त्यामुळे घाबरलेल्या प्रमिला यांनी डोळे मिटले व नंतर डोळे उघडुन बघताच क्षणात दिसेनासे झाले आणि डोळ्यापुढे अंधार दाटला.लागलीच प्रमिला यांनी आरडाओरड केली.ओरडण्याचा आवाज ऐकून नागरिकांनी धाव घेतली आणि लगेच तिला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या स्थितीत प्रमिला यांचेवर रुग्णालयात उपचार सुरू असून विजेमुळे क्षणात दृष्टी गमावण्याची वेळ आल्याने कुटुंबियांना मोठा हादरा बसला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

‘युजीसी-नेट’ परीक्षा केंद्राच्या दोनशे मीटर परिसरात मनाई आदेश जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय परीक्षा एजन्सी(NTA),नवी दिल्ली यांच्यामार्फत आयोजित 'विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा'(UGC-NET)जून-२०२६ ची परीक्षा गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालय,चामोर्शी रोड,कन्नमवार नगर येथे...

देसाईगंजच्या जुनी वडसा येथील सिटी सर्व्हे प्रक्रिया अंतिम टप्प्यात; हरकतींसाठी पंधरा दिवसांची मुदत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भूमी अभिलेख विभागामार्फत देसाईगंज शहराच्या मौजा-जुनी वडसा येथील नगर भूमापन(सिटी सर्व्हे)प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, जमीनधारकांचे हक्क व सीमा दर्शविणारा प्रारूप...

मध्यरात्री तरुणाचा धारदार शस्त्राने खून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर शहराच्या सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमदार निवासस्थानाजवळील एका गल्लीत मध्यरात्रीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!