Thursday, May 28, 2026
Homeगडचिरोलीसंशयित नक्षलवाद्याची निर्दोष मुक्तता..!

संशयित नक्षलवाद्याची निर्दोष मुक्तता..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील धानोरा-मुरूमगाव मार्गावर २० मे २००९ रोजी हत्तीगोटा पहाडीजवळ नक्षलवाद्यांनी रस्त्यावर झाडे तोडून मार्ग अडविल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दोन पोलिस अधिकारी व १४ जवान रवाना झाले असता त्यांना दीडशे ते दोनशे नक्षलवाद्यांनी घेरले होते.त्यामुळे सदरची माहिती ही मुरूमगाव पोलिस मदत केंद्राला प्राप्त होताच जाण्यासाठी निघालेल्या जवानांचा मार्ग नक्षल्यांनी येरकडजवळ जंगल परिसरात रस्त्यावर दगड टाकून अडविला होता.त्यामुळे मदत कार्य होऊ न शकल्याने नक्षलवाद्यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १४ जवान शहीद झाले होते.अश्यातच नक्षलवाद्यांनी त्यांची शस्त्रेही पळवून नेली होती.प्रकरणी गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोडेली येथील रहिवासी बिरजू पित्तो पुंगाटी वय ३६ वर्षे यांस संशयित नक्षली म्हणून सदरच्या गुन्ह्यात २५ मे २०२२ अटक करण्यात आली होती.त्यानुसार प्रारंभी तो भंडारा व नंतर नागपूर येथील कारागृहात होता.संशयित नक्षली म्हणून प्रख्यात असलेला बिरजू पुंगाटी याचेवर विविध ५० गुन्हे दाखल असल्याने नुकतीच प्रकरणाची सुनावणी गडचिरोली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्यासमोर झाली.सरकारी पक्षाने एकूण १५ साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदार व इतर बायान नोंदीनुसार तब्बल १३ वर्षानंतर न्यायालयाने त्याची ४९ गुन्ह्यातून निर्दोष सुटका केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!