Thursday, May 28, 2026
Homeगोंदियाघरून गेला तो परातलाच नाही; राशन दुकानदाराचा तलावात आढळला मृतदेह..!

घरून गेला तो परातलाच नाही; राशन दुकानदाराचा तलावात आढळला मृतदेह..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-कुठल्यातरी कारणावरून गुरुवार ७ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरी कुणालाही काहीही न सांगता निघून गेलेल्या एका २९ वर्षीय तरुण राशन दुकानदाराचा दुसऱ्या दिवशी शहराच्या तलावात चक्क मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.सारंग पुरुषोत्तम देशपांडे वय २९ वर्षे रा.देवरी शहर,जि.गोंदिया असे तलावात मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव असून सारंगचे शहरातच स्वस्त धान्याचे दुकान आहे.मृतदेह आढळताच तर्कवितर्क लावण्यात आले.सारंगला दोन भावंडे असून तो आई व भावंडांसह देवरी तहसील कार्यालय समोरील परिसरात राहत होता.सारंग हा गुरुवारच्या सायंकाळी अचानकपणे घरून निघून गेला होता.रात्र होऊनही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंतेत होते.अश्यातच काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास देवरी शहराच्या धुकेश्वरी मंदिराजवळील पवन तलावाच्या पाण्यावर काही नागरिकांना मृतदेह तरंगताना दिसून आला.सदरची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली.त्यानुसार घटनेची माहिती देवरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी स्थानिक मासेमारांच्या मदतीने सारंगचा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.सारंगच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून न आल्याने तसेच शवविच्छेदन अहवालात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने लावण्यात येणाऱ्या तर्कवितर्क तर्कवितर्कांना पूर्ण विराम मिळाला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गृहप्रवेशाच्या पत्रिका देण्यासाठी निघालेल्या तरुणावर वाटेतच काळाने झडप घालून मृत्यूने गाठल्याची घटना आज,गुरुवार २८ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान धानोरा...

पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा शेतशिवारात आढळला मृतदेह.. – वाघाच्या अफवेने वनविभागासह पोलिस यंत्रणेची मोठी धावपळ..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-घरच्यांना दवाखान्यात जात असल्याचे सांगून गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमाचा चक्क शेतशिवारात मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली.पण,मृतदेहावरील खुणा पाहून...

जंगली डुकराची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा मुख्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जंगली डुकराची धावत्या दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना...

५० हजार देऊनही २५ हजारासाठी तगादा; मंडळ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका लाचखोर मंडळ अधिकाऱ्याने  शेतजमीनीचे फेरफार करण्यासाठी तब्बल ७५ हजाराची लाच मागणी करून त्यातील ५० हजार घेऊन फेरफार करून दिले,पण उर्वरित...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!