Tuesday, September 22, 2026
Homeनागपूरबँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? - माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

बँकेत आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित आहे काय? – माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- सर्वसामान्य व्यक्ती आपल्या कष्टाचा व घाम गाळून काढलेला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वात जास्त विश्वास बँकेवर ठेवतात.बँक त्यांना सर्वात जास्त सुरक्षित वाटते.मात्र, घोटाळ्यामुळे बँकांच्या विश्वासावर तडे जात आहे.त्यामुळे सरकारने बँकिंग सेक्टरमध्ये होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.केंद्रीय जन माहिती अधिकारी अभय कुमार यांनी नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांना ही माहिती दिली आहे.आपल्या कष्टाची कमाई सुरक्षित राहावी म्हणून लोक बँकेत पैसा ठेवतात.मात्र,गेल्या काही वर्षात बँकेतील घोटाळे उघडकीस आले आहे. यात कर्जबुडवे तसेच बँकेतील अधिकऱ्यांनी केलेल्या घोटाळ्याचा समावेश आहे.

देशभरातील राष्ट्रीयकृत बँका,खाजगी बँका आणि सहकारी बँकांमध्ये हे घोटाळे झाले आहेत.१ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान बँकांमध्ये एकूण ६४ हजार ८५६ घोटाळे झाले.यात तब्बल ३९ हजार ६९८ कोटी ३७ लाख रुपयांचा अपहार झाला.तर कर्मचाऱ्यांनी ३८० घोटाळे केले.यात ३५४ कोटी ७६ लाख रुपयांचा अपहार केला असल्याची माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!