Friday, October 16, 2026
Homeनागपूरनागपुरात 'ॲडिनो व्हायरस' चा शिरकाव...- शाळकरी विद्यार्थ्यांना लागण...

नागपुरात ‘ॲडिनो व्हायरस’ चा शिरकाव…- शाळकरी विद्यार्थ्यांना लागण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नागपूर :- पश्चिम बंगालच्या कोलकात्यात ‘ॲडिनो व्हायरस’ने कहर केला आहे.मागील २४ तासांत पाच मुलांचा मृत्यूची नोंद आहे.नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण असले तरी त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत.मागील दोन वर्षे बंद असलेली शाळा,कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती यामुळे हा ‘व्हायरस’ वाढल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

पश्चिम बंगालमधील काही मुलांची चाचणी केली असता श्वसनाचा संसर्ग असलेल्या जवळपास ३२ टक्के नमुन्यांमध्ये ‘ॲडिनो व्हायरस’ आढळून आला. ताप,खोकला,नाक वाहणे किंवा श्वसनाचा त्रासानंतर पुढे न्यूमोनियाच्या संसर्गामुळे मुलांचा मृत्यू झाले आहेत.यामुळे येथील काही शाळांमध्ये ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’ व ‘सोशल’ डिस्टन्सिंग’चे नियम लागू केले आहेत.लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचे आवाहनही केले जात आहे. नागपुरातही या ‘व्हायरस’चे रुग्ण आढळून येत आहेत; परंतु, त्यांच्यात गंभीर लक्षणे नाहीत. यामुळे घाबरण्याचे कारण नाही.मात्र,लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले जात आहे.

लक्षणे 👇

हा व्हायरस सहसा शाळेतील विद्याथ्र्यांकडून घरातील व्यक्तींना होतो.

 चार दिवसांपेक्षा जास्त ताप, सर्दी, खोकला, वीकनेस, डोळे लाल होणे, अस्थमा आदी लक्षणे दिसून येतात.

काही रुग्णांमध्ये डायरियासुद्धा दिसून येतो.हा आजार गंभीर नाही नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!