Thursday, September 3, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तकुणबी प्रमाणपत्रासाठी पालकमंत्र्यांना घेराव; कार्यकर्ते आक्रमक..

कुणबी प्रमाणपत्रासाठी पालकमंत्र्यांना घेराव; कार्यकर्ते आक्रमक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे पावसाळी अधिवेशन संपले असून सध्या स्थितीत राज्याचे मंत्री आणि विधानसभा क्षेत्राचे आमदार आपल्या क्षेत्रातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फेरफटका मारतांना दिसून येत आहेत.अश्यातच शिंदे सेनेचे नेते व राज्याचे वाहतूक मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले असतांना त्यांना मराठा समाजाच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले.मराठा समाजाला दिली जाणारी कुणबी प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रे दिली जात नसल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. धाराशिवमध्ये रेस्ट हाऊसच्या बाहेरच मंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव घालून आमचे प्रश्न सोडवा मगच रेस्ट हाऊसमध्ये जा,असा आक्रमक पवित्रा घेत आंदोलकांनी जवळपास पंधरा मिनिटे पालकमंत्र्यांचा रस्ता अडवून धरला.यावेळी आंदोलक आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक झाली.धाराशिव जिल्ह्यात अनेक अर्जदारांकडे कुणबी असल्याचे पुरावे असूनही जात वैधता समितीकडून प्रमाणपत्रे नाकारली जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.प्रवेश प्रक्रिया सुरू असतांना प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकांना प्रवेश व शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागत आहे,असा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला.आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मंत्री सरनाईक यांनी जात वैधता समितीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खडसावले.या प्रकरणात मी याआधीही दोन वेळा फोन केला होता.त्यावेळी मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत,त्या सोडवण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते.दीड महिना उलटून गेला तरी अजून निर्णय का घेतले नाहीत?असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!