Monday, July 27, 2026
Homeकोंढाळासावधान..! कोंढाळा जंगल परिसरात टस्कर हत्तीची एंट्री..

सावधान..! कोंढाळा जंगल परिसरात टस्कर हत्तीची एंट्री..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जंगली हत्तींचा वावर आहे.नुकतेच जंगली हत्तींच्या कळपाने मंगळवारच्या मध्यरात्री आरमोरी तालुक्याच्या वैरागड परिसरातील धान पिकांची नासधूस केली.कळपातून भरकटलेल्या एका टस्कर हत्तीने वासाळाच्या जंगल परिसरातील कक्ष क्रमांक-७४५ मधून जंगल मार्गे सालमारा जंगल परिसरात मार्गक्रमण करत वैरागड ते आरमोरी मार्गावरील धान पऱ्हे व रोवणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले असतांनाच आता हत्तींच्या कळपातून भरकटलेल्या एका टस्कर हत्तीने देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा जंगल परिसरात एंट्री केल्याने शेतकऱ्यांसह नागरिक भयभीत झाले आहेत.टस्कर हत्ती हा कोंढाळा जंगल परिसराच्या कक्ष क्रमांक-५८ व ५९ परिसरात असल्याचे वन विभागाच्या वतीने जंगल परिसरात लावण्यात आलेल्या कॅमेरात कैद झाला असल्याने सदरची बाब उघडकीस आली. काल,गुरुवार १७ जुलै रोजी हत्तींच्या कळपातून भरकटत तो कोंढाळाच्या जंगल परिसरात दाखल झाला असून सध्या स्थितीत एकच टस्कर हत्ती जंगल परिसरात असल्याची माहिती आहे.काल गुरुवार पासून तो जंगल परिसरात भ्रमंती करीत असल्याने जंगल परिसरात जाऊ नये तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!