- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-अतिशय गरीब शेतकरी व कामगार बंधूंची बौद्ध वस्ती असलेल्या देसाईगंजच्या जुनी वडसा येथील संबोधी बुद्ध विहार येथे बौद्ध धम्माचे सांस्कृतीक कार्यक्रम पार पाडण्याकरिता सभामंडप बांधण्यात यावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजरतन मेश्राम यांच्या माध्यमातुन संबोधी बुद्ध विहाराच्या सदस्यांनी तत्कालिन आमदार क्रिष्णा गजबे यांना निवेदन सादर केले होते.त्यावेळी गजबे यांनी आपल्या स्थानिक विकासनिधितुन १० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करुन दिला.मात्र,सदरचा निधी अपुरा असल्याने राजरतन मेश्राम सनिर बोदेले,प्रशांत सुर्यवंशी , लालचंद सहारे,ताजुल उके,विक्की राऊत,महिला सदस्या वंदना सहारे,मालता राऊत,रेखा गणविर , समता खोब्रागडे यांचेसह बौद्ध समाज बांधवांनी वेळोवेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके,माजी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे सभागृह बांधकामासाठी निधीची पुर्तता करावी, यासाठी निवेदन सादर केले.त्या अनुषंगाने नुकतेच सभामंडप बांधकामासाठी १० लक्ष रुपयाच्या अतिरिक्त निधीची पुर्तता करण्यात आली असुन दोन टप्प्यात एकूण २० लक्ष रुपयाच्या सभागृह नांधकामास प्रशासकिय मंजुरी प्रदान करण्यात आली असल्याने सभागृह बांधकामातुन धम्मकार्य पार पाडण्यासाठी तसेच बौद्ध धम्मसंस्कार केन्द्र निर्मितीस मदत होईल,असा आशावाद समाजबांधवांनी व्यक्त केला.प्रसंगी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांचे समाज बांधवांच्या वतीने आभार व्यक्त करत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
- Advertisement -

