Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यासह चार आमदारांना उच्च न्यायालयाचा दिलासा; याचिका खारीज.. -...

मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यासह चार आमदारांना उच्च न्यायालयाचा दिलासा; याचिका खारीज.. – बोगस मतांच्या आधारे निवडून आल्याचा होता आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-महाराष्ट्र राज्यातील विधानसभा  निवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबर २०२४ ला पार पडले.तर २३ नोव्हेंबर २०२४ ला मतमोजणी होऊन आमदारकीचा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचे सर्वात जास्त आमदार निवडून आल्याने अनेकांनी ईव्हिएम मशीनला दोष दिले.तर काहींनी बोगस मतदानामुळे महायुतीची सत्ता स्थापन झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते.त्यानुसार भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार बंटी भांगडिया,आमदार देवराव भोंगळे व आमदार मोहन मते यांच्या
विधानसभेच्या निवडणूकीतील विजयी निकालावर काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे,गिरीश पांडव,सतीश वारजूरकर,संतोषसिंग रावत व सुभाष धोटे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.याचिकेत निवडून आलेले भाजपाचे हे सर्व आमदार बोगस मतांच्या आधारे निवडून आल्याचा आरोप तसेच निवडणूक आयोग संगनमतातून हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुडधे,दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्याविरुद्ध पांडव,चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरुद्ध वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध रावत,तर राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती.त्यानुसार फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना विरोध केला होता. दरम्यान,भाजपाच्या सर्व आमदारांनी नागपूर खंडपीठामध्ये आपले म्हणने मांडले होते. आपल्याविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यात यावा,असा अर्ज त्यांनी केला होता. निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१ (१) मधील निकष पूर्ण करीत नाही.त्यामुळे या याचिका सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावण्यात यावे,अशी विनंती फडणवीस व आमदारांनी न्यायालयाला केली होती.त्यानुसार आज,शुक्रवार ४ जुलै रोजी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढत खारीज करण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यासह चार आमदारांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!