Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीपदवीचे शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर डॉक्टरने केला बलात्कार.. - उपचारासाठी दवाखान्यात...

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय तरुणीवर डॉक्टरने केला बलात्कार.. – उपचारासाठी दवाखान्यात गेली असतांना केले कुकर्म..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असतांनाच गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका नराधम डॉक्टरने उपचार करण्याच्या बहाण्याने पदवीचे शिक्षण घेणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून बलात्कार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी बुधवार २ जुलै रोजी घडली.४८ वर्षीय नराधम डॉक्टर कोरची तालुक्याच्या बोरी गावातील रहिवासी असून सुभाष हरप्रसाद बिस्वास असे त्याचे नाव आहे. प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बेडगाव पोलिस मदत केंद्रात भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४ (२) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता कुरखेडा न्यायालयाने त्यास काल,गुरुवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
छत्तीसगड राज्य हा कोरची तालुका मुख्यालयापासून
हाकेच्या अंतरावर आहे.त्यामुळे पलीकडच्या राज्यातील काही नागरिक कोरची शहरात बाजारासाठी वा इतर कामांसाठी नेहमी येत असतात.अश्यातच पिडीत तरुणीला हगवणचा (जुलाब)त्रास होऊ लागल्याने घटनेच्या दिवशी २ जुलै ला ती भावासह दुचाकीने उपचारासाठी कोरची तालुक्यातील बोरी गावात सुभाष बिस्वास याच्या खासगी दवाखान्यात सकाळच्या सुमारास आली होती.सकाळी ९ वाजता डॉ.सुभाष बिस्वास याने भावाला बाहेर बसवले तर तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून टेबलावर लेटायला लावले व घृणास्पद कृत्य करून अत्याचार केला.पीडित तरुणीने आरडाओरड केल्यानंतर बाहेर बसलेल्या भावाने आतमध्ये धाव घेत डॉ.सुभाष बिस्वासला ठणकावले असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे देऊन धमकावू लागला.त्यामुळे घाबरलेल्या तरुणीने कोरचीच्या बेडगाव पोलिस मदत केंद्रात जाऊन तक्रार दाखल केल्याने सदर प्रकार उघडकीस आला.त्यानुसार  नराधम डॉक्टरला अटक करून न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.घटनेचा पुढील तपास बेडगाव पोलिस मदत केंद्रातील महिला पोलीस उपनिरीक्षक वर्षा बोरसे करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!