- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-धावत्या कारचा अचानकपणे टायर फुटला आणि अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत पलटली.यात कारमधील तिघांना गंभीर दुखापत झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील देवलापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जबलपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी दरम्यान सकाळच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये कारचालक नंदकिशोर रहांगडाले वय ५५ वर्षे,डॉली नंदकिशोर रहांगडाले वय १७ वर्षे व विजय शरणागत वय ३० वर्षे तिघेही रा.सिवनी,मध्य प्रदेश येथील रहिवासी आहेत.तिघेही एमपी २२ -सीए ६०७० क्रमांकाच्या कारने सिवनीहून जबलपूर-नागपूर महामार्गाने नागपूरला जात होते.दरम्यान महामार्गावरील चोरबाहुली-मरारवाडी या गावांमध्ये वेगात असलेल्या कारचा समोरचा एक टायर फुटला आणि अनियंत्रित झालेली कार रोडवर कोलांटउड्या घेत उलटली. अपघातात कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. शिवाय,कारचा अक्षरशः चुराडा झाला.स्थानिक नागरिकांनी अपघाताची पोलिसांना माहिती देत तिघांना जखमी अवस्थेत कारमधून बाहेर काढले आणि मनसर,ता.रामटेक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.तिथे प्रथमोपचार केल्यानंतर तिघांनाही नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. देवलापार पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -

