Sunday, May 3, 2026
Homeगडचिरोलीरेशीम संचालनालय संचालकांची आरमोरीच्या बोरीचक गावाला भेट; कोष खरेदी व यंत्रसामग्रीची केली...

रेशीम संचालनालय संचालकांची आरमोरीच्या बोरीचक गावाला भेट; कोष खरेदी व यंत्रसामग्रीची केली पाहणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगाला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांना थेट शासन योजनांचा लाभ मिळावा,यासाठी रेशीम संचालनालय नागपूरचे संचालक विनय मुन यांनी आरमोरी तालुक्यातील बोरीचक गावाला भेट दिली.या भेटीमध्ये त्यांनी टसर रेशीम कोष उत्पादन आणि व्यवस्थापनाचे थेट निरीक्षण केले.यावेळी मुन यांनी टसर टी.व्ही. व्यापारी कोषाची पाहणी केली आणि शासनस्तरावर सुरू असलेल्या कोष खरेदी प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना दिली.तसेच उन्नती मशीन,बुनियाद मशीन यांसारख्या अत्याधुनिक यंत्रसामग्रीची पाहणी करत त्याच्या कार्यपद्धतीबाबत माहिती जाणून घेतली.
बोरीचक,बोड्डा,सुर्यडोंगरी आदी गावांतील टसर उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधत टसर रेशीम बाजारपेठ (RMB),कोष खरेदी,वनक्षेत्राशी संबंधित समस्या,कोष धागाकरण प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली.शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी स्पष्टपणे मांडल्यावर संचालकांनी त्या समस्यांवर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.या भेटीदरम्यान प्रादेशिक रेशीम कार्यालय नागपूरचे सहाय्यक संचालक हेमंत लाडगावकर,जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए.व्ही. वासनिक,देऊळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख,क्षेत्र सहाय्यक यु.डी. मेश्राम,विलास मेश्राम तसेच सुर्यडोंगरी येथील टसर खाजगी ग्रेन्युवर्स आणि टसर शेतकरी मार्गदर्शक एस.व्ही.रामटेके उपस्थित होते.टसर रेशीम शेतीबाबत अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी जिल्हा रेशीम कार्यालय आरमोरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

भीषण अपघातात तरुण कंत्राटदाराचा मृत्यू; देसाईगंज-कोंढाळा मार्गावरील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंजवरून कामे आटोपून दुचाकीने गावाकडे निघालेल्या एका तरुण घर बांधकाम कंत्राटदाराचा(ठेकेदार)भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना आज,रविवार ३ मे रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या...

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!