Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ; निवडणुकीचा मुहूर्त लांबणीवर..

प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ; निवडणुकीचा मुहूर्त लांबणीवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-तब्बल साडे तीन वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महापालिका व नगरपालिकांच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे.कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास या निवडणुका होतील,असा अंदाज वर्तविला जात होता.मात्र,अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे.तसा शासनादेश काढण्यात आला आहे.याचा विचार करता नव्या वर्षातच महापालिका निवडणुकीचा मुहूर्त निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कित्तेक ठिकाणी साडेतीन वर्षांपासून प्रशासक राज आहे.कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती विविध जिल्ह्यातील आहे.ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने निवडणूक प्रक्रिया रखडली होती.मात्र,सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणूक घेण्याचे निर्देश दिल्यानंतर प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.चार सदस्यांचा प्रभागाचा निर्णय घेण्यात आला आहे.यासाठी नोटिफिकेशन काढण्यात आले होते.त्यानुसार ११ जूनपासून प्रगणक गटाची मांडणी,गुगल मॅपवर नकाशे तयार करणे,३१ जुलैला प्रभागरचनेचा मुसदा तयार करणे,२२ ऑगस्ट रोजी प्रभागरचना प्रसिद्ध करून त्यावर हरकती व सूचना मागवणे,९ सप्टेंबरला प्रभागरचनेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर करणे,त्यानंतर २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभागरचनेच्या अधिसूचनेस प्रसिद्धी असा कार्यक्रम आखून दिला होता.मात्र आता अंतिम प्रभागरचना अधिसूचना प्रसिद्ध करण्यासाठी ३ ऑक्टोंबर ते ६ ऑक्टोंबर अशी जवळपास एक महिन्याची मुदत वाढवून देण्यात आली आहे.दरम्यान भाजपने ‘मोदी सरकार ग्यारह साल बेमिसाल’ या माध्यमातून महापालिका निवडणुकांची तयारी चालवली आहे.४०० सभा व बैठका घेण्याचे नियोजन केले आहे.पक्ष संघटनेत मोठे बदल केले आहेत. उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.असे असले तरी डिसेंबर महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन बघता निवडणुकांचा मुहूर्त नव्या वर्षात निघेल,असा तर्क लावला जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!