Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तघर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने एका खोलीचे बांधकाम करणेही अवघड झाले आहे. विशेष म्हणजे,४०० फुटी डम्परची रेती ही २५,००० रुपयांवर पोहोचली आहे.आठवडाभरापूर्वी ३०० रुपये प्रति बॅग असलेली सिमेंट आता ३२० रुपयांवर पोहोचली आहे.लोखंडाचे भावही ५६ ते ५८ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.विटांचे भाव तर काही खरे नाही.सिमेंट आणि लाल विटा खरेदी करतो म्हटले तर १२ हजार रुपयांपासून ते १५ हजार रुपयांची एक ट्रीप होत असल्याने नुसता शौचालय आणि स्नानगृहाचेच बांधकाम करतो म्हटले तर लाखो रुपयांचा खर्च येतो आहे.त्यामुळे, कोणतेही बांधकाम करायचे झाले तर ‘कठीण आहे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.त्यातच,घरकुल बांधकाम धारकांनी ‘काहीही होवून जावो’ असे म्हणत उसनवारी घेऊन बांधकामे पूर्ण करण्याचा सपाटा जरी चालवला असला तरीही बांधकाम साहित्यांच्या वाढत्या दराने अनेकांचे कंबरडे मोडले आहे.त्यामुळे,सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!