- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एका व्यक्ती सोबत दुचाकीने जात असतांना वाटेतच भरधाव वेगात असलेल्या ट्रक-ट्रेलरने दुचाकीला जोरदार धडक देताच दुचाकीवरील महिला ट्रेलरच्या चाकात येऊन शरीराचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत पावली तर दुचाकी चालविणारा दुसरीकडे पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना काल सोमवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ वर देवरी शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील सुखसागर हॉटेल समोर घडली.अपघातात सालेकसा तालुक्यातील गिरोला येथील ३६ वर्षीय सेखा सुरेश पंधरे असे मृत महिलेचे नाव असून जियालाल महादेव छोटे रा.सोनारटोला असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीस्वार दोघेही नवाटोलाकडून एमएच ३५-एव्ही ४५८० क्रमांकाच्या दुचाकीने शिरपूरकडे जात होते.अश्यातच नवाटोला येथील राष्ट्रीय महामार्गावरील सुखसागर हॉटेल समोर येताच सीजी ०४-एनके ३०२६ क्रमांकाच्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.जोरदार धडक बसताच दुचाकीवर मागे बसलेली सेखा पंधरे ट्रेलरच्या चाकात आल्याने तिचा चेंदामेंदा होऊन जागीच ठार झाली.तर दुचाकी चालक जियालाल बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ट्रेलर घटनास्थळावरून फरार झाला.अपघाताची माहिती देवरी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत फरार ट्रेलर व चालकाला शिरपूर तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले.जखमी जियालाल याला देवरी ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून त्याच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

