- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-पूर्वी वाघ बघण्यासाठी अनेकांना विविध पर्यटनस्थळी जाऊन दर्शन घ्यावे लागे.अश्यातच आता विदर्भातील चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया,भंडारा व नागपूरसह इतर जिल्ह्यात वाघ हे पर्यटनस्थळाशिवाय स्वतःहून नागरिकांना दर्शन देऊ लागलेत.अश्याच प्रकारे आज,शुक्रवार २० जून रोजी दुपारच्या सुमारास गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव-देवरी महामार्गावरील अंजोरा आणि साखरी टोला या दोन गावांच्या परिसरात नागरिकांना दिवसाढवळ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.आज शुक्रवारी दुपारी अंजोरा गावाजवळ काही नागरिकांना वाघाचे दर्शन झाले.वाघ रस्त्यावर येताच नागरिकांनी वाघाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल केला.घटनेबाबत वन विभागास माहिती होताच वनविभागाने खबरदारी घेत घटनास्थळी पथक रवाना झाले.वाघ गावशेजारी आल्याने रेस्क्यू टीमला देखील वनविभागाच्या वतीने पाचारण करण्यात आले. दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाल्याने काहीकाळ नागरिकांची तारांबळ उडाली होती.
- Advertisement -

