Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीक्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी विभागीय स्तरावर कौशल्य चाचण्यांचे आयोजन.. - पात्र खेळाडूंची निवड...

क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी विभागीय स्तरावर कौशल्य चाचण्यांचे आयोजन.. – पात्र खेळाडूंची निवड होणार राज्यस्तर चाचणीसाठी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत राज्यात ९ क्रीडा प्रबोधिनी स्थापन करण्यात आल्या असून या प्रबोधिनीत प्रवेशासाठी कौशल्य चाचणी व सरळ प्रवेश प्रक्रियेअंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.या भरती प्रक्रियेसाठी २६ ते २७ जून २०२५ या कालावधीत विभागीय स्तरावर कौशल्य चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार असून,त्याद्वारे पात्र खेळाडूंची निवड राज्यस्तर चाचणीसाठी केली जाणार आहे.यात हँडबॉल (१३),जलतरण (७),सायकलिंग (३), फुटबॉल (७), ज्युदो (५) आणि जिम्नॅस्टिक (९) या क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडूंसाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत.७ जुलै २००६ नंतर जन्मलेले व ८ जुलै २०२५ रोजी वय १९ वर्षांपेक्षा कमी असलेले खेळाडू या निवड प्रक्रियेस पात्र ठरणार आहेत.निवड झालेल्या खेळाडूंना शासकीय खर्चावर निवासी प्रशिक्षण, शालेय शिक्षण,संतुलित आहार,निवास व्यवस्था तसेच आधुनिक क्रीडा सुविधा विनामूल्य पुरविल्या जाणार आहेत.राज्यस्तरावर पदक प्राप्त किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना त्यांच्या संबंधित खेळामध्ये तज्ञ समितीसमोर थेट चाचणी घेऊन प्रवेश देण्यात येईल. राज्यस्तरावर केवळ सहभागी असलेल्या खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जाईल.या प्रक्रियेसाठी इच्छुक खेळाडूंनी येत्या २३ जून २०२५ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,कॉम्प्लेक्स एरिया, गडचिरोली येथे सादर करावा.अर्जासोबत नाव, जिल्हा,खेळप्रकार,जन्मतारीख,वय आणि क्रीडा कामगिरीसंबंधित आवश्यक कागदपत्रांची जोड द्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!