Monday, July 20, 2026
Homeनागपूर'तुझ्याविना मी जगूच शकत नाही' असे म्हणत प्रियकराचा प्रेयसीच्या जळत्या सरणावर उडी...

‘तुझ्याविना मी जगूच शकत नाही’ असे म्हणत प्रियकराचा प्रेयसीच्या जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न.. – नागरिकांनी प्रियकरास पकडून धो-धो धुतले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :- ‘तुझ्याविना मी जगूच शकत नाही’ असे म्हणत प्रेमात वेडा झालेल्या प्रियकराने चक्क प्रेयसीच्या जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न केला.पण उपस्थित नागरिकांच्या लक्षात येताच त्याला पकडून चांगलेच धो-धो धुतले असल्याची घटना काल,सोमवार ९ जून रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास कामठी शहरालगतच्या कन्हान नदी परिसरातील शांतीघाट स्मशानभूमीत प्रेयसीवरअंत्यसंस्कार पार पडतांना घडली.अंशिका नितीन खोब्रागडे वय १९ वर्षे,रा.हनुमाननगर,कन्हान,ता. पारशिवनी,जि.नागपूर असे मृत प्रेयसीचे तर अनुराग राजेंद्र मेश्राम वय २७ वर्षे,रा.हनुमाननगर,कन्हान, ता. पारशिवनी असे जखमी प्रियकराचे नाव आहे.दोघेही एकाच भागात राहणारे असल्याने त्यांची आपसात ओळख होती.ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.त्यातच रविवारी ८ जूनला प्रेयसीने सायंकाळच्या सुमारास अचानकपणे घरीच एका खोलीत दुपट्ट्याने  गळफास घेऊन आत्महत्या केली.कुटुंबियांच्या लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला खाली उतरवून लगेच खासगी रुग्णालयात नेले.तपासणीअंती डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.कन्हान पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून शव शवविच्छेदनासाठी कामठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.उत्तरीय तपासणी प्रक्रिया पार पडल्यानंतर काल सोमवारी सायंकाळी तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तिथे प्रियकर अनुराग मेश्रामही उपस्थित होता.अश्यातच त्याने जळत्या सरणावर उडी मारण्याचा प्रयत्न करताच नागरिकांनी त्याला पकडून चांगलेच धो-धो धुतले. मारहाणीत अनुराग मेश्राम नदीच्या पात्रात बेशुद्ध पडला होता.प्रकाराची माहिती काही नागरिकांनी त्याच्या वडिलांना दिली.वडील राजेंद्र व भाऊ पवन यांनी कन्हान पोलिसांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले.तोपर्यंत तो तिथेच पडून होता. त्यांनी अनुरागला कामठी शहरातील खासगी रुग्णालयात भरती केले.काही नागरिकांच्या मते,घटनेच्या वेळी प्रियकर अनुराग मेश्राम दारू पिऊन होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी उतरले रत्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-देशातील सध्याचे चित्र काही खरे नाही. अनेकजण आपली जबाबदारी व चूक मान्य करण्यास तयारच नाहीत.तुम्ही काहीही करा,आम्हाला कसलाही फरक पडणार नाही....

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!