Friday, September 4, 2026
Homeभंडाराकुंपणावरून छलांग मारण्याच्या नादात बिबट्याचा लटकला तंगडा.. - जिवाच्या आकांताने बिबट्याचा मृत्यू..

कुंपणावरून छलांग मारण्याच्या नादात बिबट्याचा लटकला तंगडा.. – जिवाच्या आकांताने बिबट्याचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेतशिवारात पिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या तारांच्या कुंपणावरून छलांग मारण्याच्या नादात एक तंगडा लटकून बराच काळ खालत डोका वरती पाय झाल्याने बिबट्याचा
मृत्यू झाल्याची घटना भंडारा वन विभागाअंतर्गत येणाऱ्या लाखनी तालुक्यातील मलकाझरी शेतशिवारात काल रविवारी उघडकीस आली.याबाबत स्थानिकांनी माहिती देताच वन विभागाचे वनाधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले.त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात आली.पशुधन विकास अधिकारी डॉ. विठ्ठल हटवार,डॉ.सुरेश निपाणे,डॉ.स्नेहा मेश्राम यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी नामदेव मेश्राम,भंडारा जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक पंकज देशमुख उपस्थित होते. याप्रकरणी वन अपराधाची नोंद करण्यात आली आहे.
शेतशिवार परिसरात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात वाढ झाल्याने शेतकरी शेती करण्यास घाबरतात.त्यामुळे वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या हल्ल्यांच्या बचावकरिता जंगल परिसराला लागून वन विभागाच्या वतीने तारेचे कुंपण लावण्यात आले आहेत.अश्याच प्रकारे शेतीचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणावरून बिबट्याने उंच उडी(छलांग)घेतली; पण तो ताऱ्यांच्या कचाट्यात अडकला.जिवाच्या आकांताने धडपड करून शेवटी दमल्यामुळे मृत्यू झाला असावा,असा निष्कर्ष डॉक्टरांनी नोंदविला आहे.वन अधिकारी व पशुधन विकास अधिकारी यांच्या चमूने मृत बिबट्याचे प्राथमिक निरीक्षण केले. बिबट हा अवयस्क नर जातीचा असून,त्याचे वय सात ते आठ महिने आहे.बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याचे पाहणीदरम्यान आढळले. पुरकाबोडी वनविश्राम गृह परिसरात शवविच्छेदनाकरिता नेण्यात आले.कार्यवाहीनंतर दहन करण्यात आले.मृत बिबट्याच्या अवयवांचे नमुने घेण्यात आले असून,ते उत्तरीय तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!