Wednesday, July 15, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक शहीद..

नक्षलवाद्यांच्या आयईडी स्फोटात अतिरिक्त पोलिस अधीक्षक शहीद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवायांचा सपाटा सुरू असल्याने मोठमोठ्या नक्षली नेत्यांचा खात्मा करण्यात आला आहे.त्यामुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडू लागलेत.अश्यातच नक्षलींचे वर्चस्व कमी होऊ लागल्याने नक्षल्यांकडून भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे.त्यातच उद्या, मंगळवार १० जून रोजी भारत बंदच्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांच्या अनुचित घटनांना पायबंद घालण्यासाठी आज,सोमवार ९ जून रोजी सकाळच्या सुमारास अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी)आकाश राव गिरीपुंजे हे छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील दोंड्रा गावाजवळील परिसरात पायी गस्त घालत होते. यादरम्यान नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा (IED) स्फोट झाला,ज्यात आकाश राव गिरीपुंजे यांचेसह अनेक सैनिक जखमी झाले आहेत.जखमींना कोंटा रुग्णालयात नेण्यात आले असून गिरीपुंजे यांनाही गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.घटनेनंतर परिसरात शोध मोहीम वाढविण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!