Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी २३ वर्षीय तरुणाची घरीच गळफास घेऊन आत्महत्या.. - देसाईगंजच्या...

मोठी बातमी २३ वर्षीय तरुणाची घरीच गळफास घेऊन आत्महत्या.. – देसाईगंजच्या नैनपुर येथील आजची घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपुर येथे एका २३ वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरीच दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, रविवार ८ जून रोजी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.दीपक दत्तू चौधरी वय २३ वर्षे,रा.नैनपुर,देसाईगंज असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दीपक हा आज सकाळच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर पडला होता. बाहेरून घरी आल्यानंतर अंगावरील कपडे काढत त्याने घराला लागूनच असलेल्या एका खोलीतील स्लॅबच्या हुकाला दुपट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.घरच्यांनी घराच्या बाजूला असलेल्या खिडकीतून डोकावून पाहीले असता दीपक हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. दीपकला पाहताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. सदरची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. घटनेबाबत देसाईगंज पोलिसांना माहिती देण्यात आली असून दुपार पर्यंत पोलीस ताफा घटनास्थळी दाखल व्हायचा होता.२३ वर्षीय दीपकने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल कां उचलले? याबाबत अद्याप कळू शकले नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!