Friday, May 1, 2026
Homeभंडारापाच हजारासाठी पोलीस हवालदार अडकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

पाच हजारासाठी पोलीस हवालदार अडकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-बाहेर वास्तव्यास गेलेल्या तक्रारदाराच्या घरावर दुसऱ्यांनीच ताबा केला.त्यामुळे तक्रारदारांनी पोलीस ठाणे गाठले.पोलिसांत तक्रार दिल्यानंतर मुळ मालकास घराचा ताबा मिळवून देण्यासाठी एका पोलिस हवालदाराने मोबदला म्हणून २० हजार रुपये लाचेची मागणी केली.यात पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत पकडले.पोलीस हवालदाराला ताब्यात घेतले असून लाखनी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.राजेश निळकंठराव भजने वय ४९ वर्षे रा.समर्थ नगर लाखनी,जि.भंडारा असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
तक्रारदार ही नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी सन २०१८ मध्ये लाखनी येथे एक घर खरेदी केले होते.त्यांनतर ते नागपूर येथे राहण्यास गेले होते. १७ एप्रिल २०२५ रोजी एक महिला व तिचा मुलगा यांनी त्यांचे घराचे कुलूप तोडून त्याचा ताबा घेतला. यावेळी तक्रारदार यांनी पोलीस ठाणे लाखनी येथे तक्रार दिली असता घटनेच्या अनुषंगाने लाखनी पोलिसांनी १८ एप्रिल २०२५ ला महिला व तिच्या मुलाविरुद्ध गुन्हा नोंदविला.या गुन्ह्यात सहकार्य करून महिला व तिच्या मुलास घरातून बाहेर काढून घराचा ताबा तक्रारदार यांना देण्याकरिता पोलीस हवालदार राजेश भजने यांनी तक्रारदाराकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली.त्याचा पहिला हफ्ता ५ हजार रुपये त्यांनी लाच म्हणून मागितला आहे, अशी तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे २२ एप्रिल रोजी करण्यात आली.
तक्रारीच्या अनुषंगाने २३ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक पोलीस हवालदार भजने यांनी तडजोडअंती लाच रकमेचा पहिला हफ्ता ५ हजार रुपये स्वतः साठी स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. तक्रारीवरून काल बुधवारी १४ मे रोजी सापळा रचण्यात आला.भजने यांना तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. याप्रकरणी पोलीस हवालदार राजेश भजने यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सदरची कारवाई पोलीस उपधीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक संजय कुंजरकर,हवालदार मिथुन चांदेवार,अतुल मेश्राम,शिलपेंद्र मेश्राम,अंकुश गाढवे, नरेंद्र लाखडे,विष्णू वरठी,चेतन पोटे,मयूर सिंगणजूडे, विवेक रणदिवे,राहुल राऊत यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!