Wednesday, September 23, 2026
Homeमुंबईसावधान..! अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बनावट..

सावधान..! अकरावी प्रवेशाचे संकेतस्थळ बनावट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.या संकेतस्थळाची माहिती अद्याप शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली नाही.अकरावीच्या प्रवेशाची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोपी व्हावी,यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून येत्या १९ मे रोजी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे.अशातच आता अकरावी प्रवेशाच्या नावाने बनावट प्रवेशाची संख्येतस्थळ निदर्शनास येऊ लागली आहे.दहावीचा निकाल जाहीर झाला नसला तरी लाखो विद्यार्थी या संकेतस्थळाला भेट देऊन अकरावी प्रवेशासंदर्भातील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.यातून विद्यार्थ्यांची दिशाभूल होऊन त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात निर्णय घेवून अशा संकेतस्थळावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.मुंबई,पुणे-पिंपरी चिंचवड,नागपूर,नाशिक,अमरावती आणि छत्रपती संभाजी नगर या सहा महानगरपालिका क्षेत्रामधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत होती.आता सर्वच राज्यात प्रवेश ऑनलाइन होणार असल्याने दहावीच्या परीक्षेला बसलेले जवळपास १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेची माहिती जाणून घेण्यासाठी बनावट संकेतस्थळाला भेट देण्याची शक्यता आहे.त्यामुळे शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून ठोस पावले उचलण्याची गरज आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!