Wednesday, April 15, 2026
Homeमुंबईजेव्हा एखादी महिला 'नो' म्हणाली तर संमती गृहीत धरता येणार नाही- उच्च...

जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणाली तर संमती गृहीत धरता येणार नाही- उच्च न्यायालय -सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन पुरूषांची शिक्षा कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-एखाद्या महिलेला कुणी एखाद्याने बॅड टच केलं तर त्या महिलेला पटकन लक्षात येत असते व तिच्याकडून नकारात्मक भूमिका घेतली जाते.मात्र, काहीजण जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणजेच नाही म्हणाली तरीही जोर जबरजस्ती करून तिच्या शरीरावर,मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला चढवीत असतात.त्यामुळे जेव्हा एखादी महिला ‘नो’ म्हणते तेव्हा त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो आणि तिच्या मागील लैंगिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.असे न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी आणि न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवानी यांच्या खंडपीठाने निकालात म्हटले व सामूहिक बलात्कार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने तीन पुरूषांची शिक्षा कायम ठेवली आहे.न्यायालयाने तिघांची शिक्षा रद्द करण्यास नकार दिला,परंतु त्यांची शिक्षा जन्मठेपेवरून २० वर्षांपर्यंत कमी केली.पीडितेच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा आरोपीचा प्रयत्न स्वीकारण्यास खंडपीठाने नकार  दिला. न्यायालयाने म्हटले आहे की महिलेच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध ठेवणे हा तिच्या शरीरावर, मनावर आणि गोपनीयतेवर हल्ला आहे. न्यायालयाने बलात्काराला नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या समाजातील सर्वात निंदनीय गुन्हा म्हणून वर्णन केले आहे.उच्च न्यायालयाने म्हटले आहे की,जर एखादी महिला नाही म्हणते तर त्याचा अर्थ ‘नाही’ असा होतो.यात कोणतीही अस्पष्टता नाही आणि महिलेच्या कथित अनैतिक कृतींच्या आधारे संमती गृहीत धरता येत नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!