Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआयपीएल क्रिकेट सामने तात्पुरते स्थगित..

आयपीएल क्रिकेट सामने तात्पुरते स्थगित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरणामुळे आयपीएल २०२५ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. दोन्ही देशांमधील तणाव सतत वाढत आहे.आयपीएलचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे होणार होता,परंतु देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे तो रद्द करण्यात आला. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की,देशात युद्ध सुरू असतांना आपण क्रिकेट खेळत राहणे चांगले वाटत नाही.याचा अर्थ असा की, देशाची सुरक्षा खेळांपेक्षा जास्त महत्त्वाची आहे.लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना आज,शुक्रवार ९ मे रोजी एकाना स्टेडियमवर होणार होता.पण आता सध्या स्थितीत होणार नाही.काल ८ मे रोजी पंजाब किंगज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील आयपीएल सामनाही सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.८ मे रोजीच,भारतीय सैन्याने रात्री नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या काउंटर-ड्रोन ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. पाकिस्तानने भारतात ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.या घटनांनंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.देशाची सुरक्षा प्रथम  म्हणून हा निर्णय घेण्यात आला.खेळ नंतरही होऊ शकतो,पण देश सुरक्षित राहिला पाहिजे.देशातील सध्याच्या वातावरणात क्रिकेट खेळणे योग्य नाही.
परिस्थिती सामान्य झाल्यावरच ते पुन्हा सुरू केले जाईल.आयपीएल प्रमुख अरुण धुमल यांच्या गृहनगर धर्मशाला येथे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना १०.१ षटकांनंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान,भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही भारतीय सैन्याला पाठिंबा दिला आहे.आता आयपीएलचे १६ सामने बाकी आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!