- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-राज्यात गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.विशेष म्हणजे,लैंगिक अत्याचार किंवा बलात्काराच्या घटनांमध्ये बहुतांश आरोपी हे जवळचे किंवा ओळखीचेच असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.दरम्यान,भंडाऱ्यात नुकत्याच घडलेल्या आणखी एका घटनेने संताप व्यक्त होत आहे.
विकृतीचा कळस गाठून एका ३६ वर्षीय नराधमाने
चॉकलेटचे आमिष दाखवून घराशेजारी राहणाऱ्या दोन चिमुकलींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.या प्रकरणी करडी पोलिसांनी ३६ वर्षीय अतुल बुराडे या आरोपीस अटक केली असून त्याला न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.करडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंढरी गावातील घटना असून आरोपी अतुल बुराडे याने घराशेजारी राहणाऱ्या ८ आणि ९ वर्षीय चिमुकलींसोबत अत्याचार केल्याचे समोर आले आहे.मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू होता.पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.सदरच्या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
- Advertisement -

